Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नोकरीची संधी; 56000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

Job News ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नोकरीची संधी; 56000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : सांगली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज पाठवावा लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे रिसर्च सायंटिस्ट- १/सायंटिस्ट बी – (मेडिकल) यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगलीच्या मिरज येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे रिसर्च सायंटिस्ट- १/सायंटिस्ट बी – (मेडिकल)

– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मिरज-सांगली

– वेतन/ मानधन : दरमहा रु. ५६,०००/- + HRA/- .
– वयोमर्यादा : कमाल 35 वर्ष.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 डिसेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्ही.आर.डी.एल. सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.gmcmiraj.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!