पुणे : मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १८ फेब्रुवारी २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, मुंबई येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 14 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 50,000/- ते रु. 90,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा अधिक नसावे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ फेब्रुवारी २०२६ संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मंबई- 22.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


