पुणे : सांगलीतील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २९ आणि ३० डिसेंबर २०२५ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव, सांगली येथे तासिका तत्वावर अधिव्याख्यात्यांची यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.grwptasgaon.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तासिका तत्वावर अधिव्याख्यात्यांची.
– नोकरीचे ठिकाण : तासगाव, सांगली.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : २९ आणि ३० डिसेंबर २०२५.
– मुलाखतीचा पत्ता : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव, मणेराजुरी रोड, तासगाव, जिल्हा : सांगली (एमएस), पिन कोड : ४१६ ३१२.


