पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, दि कोल्हापूर अर्बन बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
दि कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लिमिटेड, कोल्हापूर येथे लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 50 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लिपिक.
– एकूण रिक्त पदे : 50 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– परीक्षा शुल्क : रु.७५०/- परीक्षा शुल्क + १८% जीएसटी + लागू बँक व्यवहार शुल्क.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://kopurbanbank.com/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


