पुणे : नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 30 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत सहाय्यक प्रकल्प अभियंता यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्रकल्प अभियंता.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वेतन / मानधन : दरमहा 25000
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : kumar.anilsah14@mme.vnit.ac.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://vnit.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


