पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन (ई- मेल) किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे येथे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत पाच रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्रशासकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा 38600 ते 122800 रुपयांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ एप्रिल २०२६.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : sceapune@gmail.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://scea.maharashtra.gov.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


