पुणे : पुण्यातील प्रसिद्ध आबेदा इनामदार सीनियर कॉलेज येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आबेदा इनामदार सीनियर कॉलेज येथे रिक्त पदांवर संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 11 सप्टेंबर, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
– पदसंख्या – 18 जागा
– शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
– नोकरीचे ठिकाण – पुणे
– अर्ज पद्धती – ऑफलाईन
– निवड प्रक्रिया – मुलाखती
– अर्ज पाठवण्याचा पत्ता – धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शिक्षण संस्था २३९० के.बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे – ४११००१
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.abedainamdarcollege.org.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


