पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या बँक ऑफ बडोदा येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळू शकतो.
बँक ऑफ बडोदा येथे ग्राहक सेवा प्रतिनिधी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ३० रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ग्राहक सेवा प्रतिनिधी.
– एकूण रिक्त पदे : 30 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २२ एप्रिल २०२६.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ मे २०२६
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.bankofbaroda.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


