पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, नाशिकच्या प्रसिद्ध बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
बिजनेस को-ऑप बँक लिमिटेड, नाशिक येथे एचआर मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : एचआर मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर.
– एकूण रिक्त पदे : 08 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑक्टोबर २०२५
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : द बिझनेस को-ऑप. बँक लि. नाशिक रोड, राजन कॉम्प्लेक्स आर्केड, दत्तमंदिर चौक, नाशिक रोड-422101.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : hr@businessbanknashik.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.businessbanknashik.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


