पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोल्हापूर महानगरपालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सात रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 60000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. 70 वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दर सोमवारी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत अर्ज करता येणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. दर सोमवारी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://kolhapurcorporation.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– वेतन / मानधन : दरमहा 60000 रुपये
– वयोमर्यादा : ७० वर्षांपर्यंत
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची तारीख : दर सोमवारी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : दर सोमवारी ३ वाजता.
– अर्ज करण्याची, मुलाखतीचा पत्ता : NUHM कार्यालय (दुसरा मजला), श्री पंचगंगा हॉस्पिटल.


