Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे आयएफसी ब्लॉक अँकर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत पाच रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर जि. प. परिसर, चंद्रपूर येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://umed.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : आयएफसी ब्लॉक अँकर.
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.

– नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर (सिंदेवाही, जिवती, कोरपना, सावली व ब्रम्हपुरी तालुक्यात).
– वयोमर्यादा : कमाल 43 वर्ष असावे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा ४० गुण व प्रत्यक्ष मुलाखत १० गुण.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ नोव्हेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर जि. प. परिसर, चंद्रपूर.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!