Today रविवार, 2nd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ६ जानेवारी २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसिन, ईएनटी सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस आरबीएसके), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), रुग्णालय व्यवस्थापक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नंदुरबार येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nhm.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव :  डीईआयसी व्यवस्थापक, सीपीएचसी सल्लागार, अभियंता-बायोमेडिकल, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स महिला, कनिष्ठ अभियंता-सिव्हिल, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स (ब्लॉक एम अँड ई), अकाउंटंट (एफएमजी अकाउंटंट), ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर.

– एकूण रिक्त पदे : 98 पदे.

– नोकरीचे ठिकाण : नंदुरबार.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.

– अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी: रु. 150/- आणि राखीव वर्गासाठी: रु. 100/-.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 05 डिसेंबर 2025.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2025

– अर्ज सादर करण्याचा पत्ता : आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : ०६ जानेवारी २०२६

– मुलाखतीची पत्ता : आर.ए.ए. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!