पुणे : बीडच्या पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय येथे नोकरीची संधी मिळू शकते. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 15 सप्टेंबर, 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, बीड येथे अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक (रसायनशास्त्र)
⇒ नोकरी ठिकाण: बीड.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: 15 सप्टेंबर 2025.
⇒ मुलाखतीचा पत्ता : पीएम श्री शाळा जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता- गेवराई जिल्हा- बीड
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://navodaya.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


