पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
भारतीय स्टेट बँकेत उपाध्यक्ष (यूएक्स), उप उपाध्यक्ष (यूएक्स), सहाय्यक उपाध्यक्ष (यूएक्स), वरिष्ठ विशेष कार्यकारी (यूआय आणि यूएक्स), उप व्यवस्थापक (यूआय आणि यूएक्स) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबईत जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उपाध्यक्ष (यूएक्स), उप उपाध्यक्ष (यूएक्स), सहाय्यक उपाध्यक्ष (यूएक्स), वरिष्ठ विशेष कार्यकारी (यूआय आणि यूएक्स), उप व्यवस्थापक (यूआय आणि यूएक्स).
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १६ जानेवारी २०२६.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.sbi.co.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


