Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज, पगारही चांगला

मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज, पगारही चांगला

पुणे : तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आपल्यापैकी काही जणांनी अनेक परीक्षा, मुलाखतीही दिल्या असतील तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे.

जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे बायोमेडिकल असिस्टंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2025 ही असणार आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 25000 ते 30000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात…

– पदाचे नाव : बायोमेडिकल असिस्टंट.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 04 सप्टेंबर 2025.

– मुलाखतीचा पत्ता : एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई-४०००१२

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!