Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, काहीच दिवस शिल्लक…

पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, काहीच दिवस शिल्लक…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र येथे विधी निर्देशक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रभरात जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ५२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahapolice.gov.in/ या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

⇒ पदाचे नाव : विधी निर्देशक.

⇒ रिक्त पदे: 52 पदे.

⇒ वयोमर्यादा: नियुक्तीचे वेळी ६० वर्षापेक्षा जास्त नसेल.

⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

⇒ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 04 मे 2026.

⇒ अर्ज  पाठवण्याचा पत्ता : अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!