पुणे : मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ सल्लागार, नेफ्रोलॉजिस्ट, रक्त संक्रमण अधिकारी, मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट, भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी), कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ, दूरध्वनी चालक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 69 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर, क्ष-किरण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.), ए.आर.सी सल्लागार & ऑर्थोटिक तंत्रज्ञ.
⇒ एकूण रिक्त पदे : 69 पदे
⇒ नोकरीचे ठिकाण : मुंबई.
⇒ शैक्षणिक पात्रता : डीएम, डीएनबी, एमडी, एम.एससी., बी.एससी., १२ वी, १० वी उत्तीर्ण
⇒ वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षे.
⇒ वेतन / मानधन : दरमहा रु. १६००० – २०००००/-.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
⇒ अर्ज शुल्क : रु. ९३३/- (जीएसटी सह)
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
⇒ अर्ज पाठवण्याचा करण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका.


