पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भारत सरकारच्या एका विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे वरिष्ठ संशोधन सहकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 37000 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. ४५ वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी डॉ. सुजॉय साहा, प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रकल्प प्रमुख, ICAR – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पोस्ट बॉक्स क्र. ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रस्ता, पुणे – ४१२३०७, महाराष्ट्र येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://nrcgrapes.icar.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


