Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! केंद्रीय विद्यालयात नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड…

Job News ! केंद्रीय विद्यालयात नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड…

पुणे : पीएम श्री केंद्रीय विद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पीएम श्री केंद्रीय विद्यालय वायू सेना स्थल देवलाली, नाशिक येथे खेळ/क्रीडा प्रशिक्षक, विशेष शिक्षक, योग प्रशिक्षक, व्यावसायिक शिक्षक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : खेळ/क्रीडा प्रशिक्षक, विशेष शिक्षक, योग प्रशिक्षक, व्यावसायिक शिक्षक.
– नोकरीचे ठिकाण : देवळाली, नाशिक.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : २७ नोव्हेंबर २०२५ सकाळी ९:०० वाजता.
– मुलाखतीचा पत्ता : पीएम श्री केंद्रीय विद्यालय वायु सेना स्थल देवलाली, दक्षिण देवलाली नाशिक – ४२२५०१.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://no2afsdevlali.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!