पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, बृहन्मुंबईच्या एका रुग्णालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे वरिष्ठ सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सहा रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 200000 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सदर अर्ज आवक-जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई-२२ या पत्यावर पाठवावा लागणार आहे. २० फेब्रुवारी २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


