Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेगा भरती; पगारही चांगला मिळणार…

Job Alert ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेगा भरती; पगारही चांगला मिळणार…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अलिबाग येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अलिबाग, जि- रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 40 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी आवक-जावक शाखेस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.gmchalibag.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक.
– रिक्त पदे : 40 पदे.

– नोकरीचे ठिकाण : अलिबाग, जि- रायगड.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० एप्रिल २०२६, संध्याकाळी 05:00 पर्यंत.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक-जावक शाखेस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता.

– मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (परिषद हॉल).

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!