Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगा भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Job Alert ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगा भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे शिकाऊ उमेदवार {COPA (PASSA), इलेक्ट्रीशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक, प्लंबर, DTP ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन सिव्हिल, सर्वेयर, मेकॅनिक मोटर वाहन} या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 407 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मे २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार {COPA (PASSA), इलेक्ट्रीशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक, प्लंबर, DTP ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन सिव्हिल, सर्वेयर, मेकॅनिक मोटर वाहन}.

– एकूण रिक्त पदे : 407 पदे.

– नोकरीचे ठिकाण : पिंपरी.

– वेतन/ मानधन: दरमहा रु. 7,700/- ते रु. 8,050/- पर्यंत.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन.

– ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ मे २०२६.

– ऑनलाईन अर्ज, इ. कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरुपात सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी, पिंपरी

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!