पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अंधेरी पूर्व, मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 53 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही २०, २१ आणि २२ मे २०२६ रोजी डीन कार्यालय, सेंट्रल रोड, MIDC, MIDC पोलीस ठाण्यासमोर, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – 400093 येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 53 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अंधेरी पूर्व, जि. मुंबई.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : २०, २१ आणि २२ मे २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : डीन कार्यालय, सेंट्रल रोड, MIDC, MIDC पोलीस ठाण्यासमोर, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – 400093.


