Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुवर्णसंधी ! कॅनरा बँकेत मेगा भरती; पदवीधारकांनाही मिळू शकते संधी, पगारही चांगला…

सुवर्णसंधी ! कॅनरा बँकेत मेगा भरती; पदवीधारकांनाही मिळू शकते संधी, पगारही चांगला…

पुणे : तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला बँकेत नोकरी मिळू शकणार आहे. बँकेत नोकरीसाठी अनेकांचा प्रयत्न असतो, त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या कॅनरा बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

कॅनरा बँकेत पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ३५०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 15000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे.

यामध्ये वयोमर्यादाही निश्चित केली जाणार असून, 20 ते 28 वर्षे असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी दिली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबरपासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2025 ही असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://canarabank.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!