पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे प्रशासकीय अधिकारी {सामान्यवादी आणि हिंदी (राजभाषा) अधिकारी} या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ३०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी {सामान्यवादी आणि हिंदी (राजभाषा) अधिकारी}.
– एकूण रिक्त पदे : 300 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– वयोमर्यादा : २१ वर्षे ते ३० वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://orientalinsurance.org.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


