पुणे : UIDAI आधार येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २० मे २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. UIDAI आधार येथे आधार पर्यवेक्षक/ ऑपरेटर यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : आधार पर्यवेक्षक/ ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 24 पदे.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (इंटरमीडिएट/सिनियर सेकेंडरी) किंवा १० वी उत्तीर्ण + २ वर्षांचा आयटीआय किंवा १० वी उत्तीर्ण + ३ वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा.
– वयोमर्यादा : किमान १८ वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मे २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://csc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


