पुणे : अमरावती महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अमरावती महानगरपालिकेतील रुग्णालयात ANM नर्स या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती, पिन कोड- ४४४६०१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://amravaticorporation.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


