पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता अर्ज करता येणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे विशेषज्ञ वरिष्ठ निवासी लॅब टेक्निशियन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 145530 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. 40 वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. त्यासाठी https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विशेषज्ञ वरिष्ठ निवासी.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा 145530
– वयोमर्यादा : 40 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : २३ मार्च २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : संचालक (शैक्षणिक) यांचे कार्यालय, होमी भाभा ब्लॉक, १३ वा मजला, खोली क्र. १३०१, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई.


