पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स’ येथे वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 25 ऑगस्ट 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही आवश्यक पात्रतेनंतर केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 30000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी http://web-app.iucaa.in:8080/iucaa/jsp/PER_JOB_APP/suit/202508_SUIT_SCI_TRE.jsp या वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा 30000 रुपये
– वयोमर्यादा : 25 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.


