Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Father Kills Daughter: भयंकर! 50 पर्यंत अंक लिहिता आले नाहीत म्हणून जन्मदात्या बापाने चार वर्षांच्या चिमुरडीला संपवलं

Father Kills Daughter: भयंकर! 50 पर्यंत अंक लिहिता आले नाहीत म्हणून जन्मदात्या बापाने चार वर्षांच्या चिमुरडीला संपवलं

Father Kills Daughter: शिक्षण हे संस्कारांसाठी असते, पण फरिदाबादमध्ये शिक्षणाच्या नावाखाली एका निर्दयी पित्याने नात्याला काळिमा फासणारी घटना घडवली आहे. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकलीला १ ते ५० पर्यंत अंक मोजता आणि लिहिता आले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या बापाने तिला इतकी अमानुष मारहाण केली की, त्या निरागस जिवाचा जागीच अंत झाला. २१ जानेवारीला घडलेल्या या घटनेचे थरारक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.

बापाचा ‘क्रूर’ अवतार

आरोपीचे नाव कृष्णा जयस्वाल (वय ३१) असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याची पत्नी एका खाजगी कंपनीत कामाला जाते, तर कृष्णा घरी राहून मुलांची देखभाल करत असे. घटनेच्या दिवशी तो मुलीचा ‘अभ्यास’ घेत होता. त्याने तिला १ ते ५० पर्यंतचे अंक कागदावर लिहिण्यास सांगितले. मात्र, चिमुकलीला ते न जमल्याने कृष्णाचा संयम सुटला आणि त्याने हैवानियत दाखवत पोटच्या गोळ्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – Pune Crime: चारित्र्याचा संशय अन् हुंड्याची हाव! विवाहितेला चामड्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण

घटनेतील हृदयद्रावक वास्तव

बापाने चिमुकलीला इतक्या जोरात मारले की तिच्या डोक्याला आणि शरीराच्या नाजूक भागांना गंभीर जखमा झाल्या. मार सहन न झाल्याने ती चिमुरडी बेशुद्ध पडली आणि ज्या वडिलांच्या मांडीवर तिने खेळायला हवे होते, त्याच मांडीवर तिने शेवटचा श्वास घेतला. सायंकाळी आई कामावरून घरी परतली तेव्हा तिला मुलगी निर्जीव अवस्थेत दिसली. आपल्या पोटच्या पोरीचा असा अंत पाहून आईने फोडलेली किंकाळी ऐकून परिसरातील नागरिकांचेही डोळे पाणावले.

आरोपीला कोठडी, परिसरात संताप

मुलीच्या आईने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपी कृष्णा जयस्वालला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी यापूर्वीही मुलीला अशाच प्रकारे मारहाण करायचा का, याचा तपास पोलीस करत आहेत. एका निष्पाप मुलीचा केवळ शिक्षणाच्या अट्टाहासापोटी बळी गेल्याने संपूर्ण फरिदाबादमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अशा नराधम बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!