Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sahar Sheikh Apology: किरीट सोमय्यांचा दणका! ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ म्हणणाऱ्या सहर शेख यांनी मागितली माफी

Sahar Sheikh Apology: किरीट सोमय्यांचा दणका! ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ म्हणणाऱ्या सहर शेख यांनी मागितली माफी

Sahar Sheikh Apology: ‘कैसा हराया’ म्हणत मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

तच शेख यांनी केलेले “हम मुंब्रा को हरा बना देंगे” हे विधान चांगलेच चर्चेत राहिले. यावरून भाजप, शिवसेनेकडून जोरदार टिका झाली.

या विधानाच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली होती.

सोमय्या यांच्या दणक्यानंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेखी माफीनामा घेतला. ‘कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता’, असे सहर शेख यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.

सहर शेखचा त्या विधानानंतर माफीनाम

“हम मुंब्रा को हरा बना देंगे” या वक्तव्याबद्दल माफी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. “सहर शेखचा “माफीनामा”. AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सहर शेखनी हिंदुना चिथावणी देणाऱ्या “हम मुंब्रा को हरा बना देंगे” या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

मुंब्रा पोलिसांनी माझ्या तक्रारीनंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुराव्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात दिली” असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

माफीनाम्यात काय लिहिले?

सहर शेख यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे. यामध्ये त्यांनी मुंब्रा येथे झालेल्या सभेत “हम मुंब्रा को हरा बना देंगे” असं भाषण केलं होतं. पण हे वाक्य पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोलल्याचं सांगितलं.

“कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू. वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते” असं सहर शेख यांनी आपल्या लेखी जबाबात लिहून दिलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!