Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rupali Thombre Patil: ‘कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला असेल, तर त्या मी भीक…’; रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप

Rupali Thombre Patil: ‘कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला असेल, तर त्या मी भीक…’; रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप

Rupali Thombre Patil: महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उप अभियंता सुधीर आलुरकर (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता महापालिकेच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी हरकत अर्जाची पोच देण्याची मागणी करत मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षेच्या कारणास्तव उभारण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड केल्याने निवडणूक प्रक्रियेत तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही उमेदवार व प्रतिनिधींनीही गोंधळ घालून परिस्थिती तणावपूर्ण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तेली करत आहेत.

दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीनंतर मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. अशा गुन्ह्याला मी घाबरत नाही. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने आत्मपरीक्षण करावे. पोलिसांनी आपली अकार्यक्षमता दाखवली आहे. कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला असेल, तर त्याला मी भीक घालत नाही. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!