Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: किरकोळ वाद, लाकडी दांडक्याचा प्रहार अन् तरुणाला थेट विहिरीत फेकलं…खेडमध्ये बांधकामाच्या वादातून थरार

Pune Crime: किरकोळ वाद, लाकडी दांडक्याचा प्रहार अन् तरुणाला थेट विहिरीत फेकलं…खेडमध्ये बांधकामाच्या वादातून थरार

Pune Crime: बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडली आहे. शेतातील कंपाउंडचे काम सुरू असताना एका तरुणाला लाकडी काठीने मारहाण करून थेट विहिरीत ढकलून देण्यात आले. सुदैवाने, नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पीडित तरुण थोडक्यात बचावला आहे.

नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय पीडित तरुण आपल्या शेतात कंपाउंड घालण्याचे काम करत होता. बुधवारी (२१ जानेवारी) सायंकाळी ७ च्या सुमारास आरोपी चारचाकी गाडीतून तिथे पोहोचला. “कोणाला विचारून हे काम सुरू केले?” असा जाब विचारत त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यावर आरोपीने लाकडी दांडक्याने तरुणाच्या जबड्यावर जोरदार प्रहार केला. आरोपीने “थांब तुला ठारच मारतो,” अशी गर्जना करत तरुणाला शेजारीच असलेल्या खोल विहिरीत जोरात ढकलून दिले. तरुण विहिरीत पडताच त्याने आरडाओरडा केला. जवळच असलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तत्काळ विहिरीकडे धाव घेतली आणि त्याला सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा – Pune Crime: चारित्र्याचा संशय अन् हुंड्याची हाव! विवाहितेला चामड्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण

जबड्याला गंभीर दुखापत, पोलिसांत गुन्हा दाखल

या भयंकर हल्ल्यात तरुणाच्या जबड्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ‘खुनाचा प्रयत्न’ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरू

चाकण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत आरोपीची मजल गेल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!