Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Accident: नवले पुलाजवळ अपघात; दुचाकी घसरून पादचाऱ्याला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune Accident: नवले पुलाजवळ अपघात; दुचाकी घसरून पादचाऱ्याला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे: मुंबई-बंगळुरू मार्गावर नवले पुलाजवळ दुचाकी घसरून दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाह्यवळण येथे हा अपघात झाला. तर, दुचाकी घसरल्याने एक पादचारी धडकेत जखमी झाला. जखमी पादचारी रस्ता ओलांडत होता. मेघनारायण शिंदे (62, रा कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अपघातात पादचारी गणेश कोडीतकर (50, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हे जखमी झाले. कोडितकर यांनी याबाबत आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोडीतकर हे गुरुवारी (दि. 16) सकाळी साडेपाचच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. कोडितकर हे पॅनोरमा सोसायटीसमोरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी समोरून भरधाव आलेले दुचाकीस्वार शिंदे यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली.

कोडितकर यांना दुचाकीने धडक दिली. दुचाकी घसरल्याने मेघनारायण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोडितकर आणि मेघनारायण यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुचाकीस्वार मेघनारायण यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस कर्मचारी कांबळे करत आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!