Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शनिवारवाड्यात नमाज पठण, भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; व्हायरल VIDEO मध्ये नेमकं काय?

शनिवारवाड्यात नमाज पठण, भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; व्हायरल VIDEO मध्ये नेमकं काय?

Pune Shaniwar Wada Viral Video: पुण्यातील ऐतिहासिक वारसास्थळ शनिवारवाड्यातून एक व्हिडीओ मोर आला आहे. ज्यामुळे सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या एक्स अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात काही मुस्लीम महिला शनिवारवाड्यात नमाज पठण करत असल्याचं दिसत आहे. यानंतर पुण्यात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान या व्हिडीओवर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेकडूनही याचा निषेध केला जात आहे. दोन्ही संघटना आज शनिवार वाड्याजवळ शिववंदना करणार आहेत.

मेधा कुलकर्णींच्या पोस्टमध्ये काय?

मेधा कुलकर्णी यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, शनिवारवाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे !

तसंच त्यांनी चलो शनिवार वाडा! अशी हाकही दिली आहे. रविवार, 19 ऑक्टोबर 2025, शनिवार वाडा, कसबा पोलीस चौकीसमोर, सायंकाळी 4 वाजता असं सांगत त्यांनी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. पुण्याचे वैभव शनिवार वाडा, ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार. हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय! पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया! अशी हाक त्यांनी दिली आहे.

 

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत शनिवारवाड्याचा परिसर दिसत आहे. यावेळी तिथे 6 ते 7 महिला नमाज पठण करताना दिसत आहे. यादरम्यान तिथे मुलं खेळताना, तसंच इतर लोक नेहमीप्रमाणे फिरताना दिसत आहेत. शनिवारवाड्याच्या वरच्या भागातून कोणीतरी हा व्हिडीओ शूट केला असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ 1 मिनिटं 6 सेकंदांचा आहे. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ खरा असल्याचं दिसत आहे, मात्र त्याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. तसंच हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!