Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या जोडीला दिवाळीच्या खास दिवशी खास भेट मिळाली आहे. परिणीती चोप्राला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथे तिने एका मुलाल जन्म दिला आहे. नवजात बाळाचा आनंद सामायिक करण्यासाठी राघव चढ्ढा सोबत गेले होते. राघव चढ्ढाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितले की, परिणीती चोप्राला मुलगा झाला आहे. परिणीती आणि राघव आता आई-बाबा झाले असून, या नवीन सुखद प्रसंगाचा आनंद त्यांनी मनसोक्त अनुभवला आहे.
View this post on Instagram
रुग्णालयात या आनंदाच्या प्रसंगी दोघांचे कुटुंब देखील उपस्थित होते. संपूर्ण कुटुंब दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नव्या पाहुण्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक होते. या वर्षीच ऑगस्ट महिन्यात परिणीती आणि राघवने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती की, लवकरच ते आई-बाबा होणार आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, लवकरच त्यांचे जीवन ‘दोन ते तीन’ मध्ये बदलणार आहे. सोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यात दोघेही पार्कमध्ये चालताना दिसत होते.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी 2023 मध्ये उदयपूरमधील लीला पॅलेस येथे लग्न केले होते. या लग्नसमारंभात केवळ काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानसह अनेक राजकीय नेते देखील उपस्थित होते.
परिणीती– राघवची प्रेम कहाणी
लग्नाच्या वेळी परिणीतीने मनीष मल्होत्रा डिझाईन केलेला हलका आइवरी रंगाचा लहंगा परिधान केला होता तर राघवने क्लासिक क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. लग्नासह होणाऱ्या पारंपरिक हळदी, मेहंदीसोहळ्यासोबत एक सूफी नाईटचा देखील आयोजन करण्यात आले होते.
परिणीती आणि राघवची प्रेमकहाणी लंडनमध्ये सुरू झाली होती. जिथे दोघेही एकत्र अभ्यास करत होते. काही वर्षांनी ते भारतात पुन्हा भेटले आणि नंतर विवाहाच्या बंधनात अडकले. ही घटना परिणीतीच्या चाहत्यांसाठीही आनंदाचा क्षण ठरला आहे. कारण त्यांनी त्यांच्या प्रिय अभिनेत्रीला आई होण्याचा अनुभव घेताना पाहिले आहे.


