Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Daund Crime: दौंड हादरलं! शाळेच्या रिझल्टवरून पोटच्या 9 वर्षांच्या लेकीची नराधम बापाने संपवलं; कटरने वार केल्यानंतर पेटवला मृतदेह

Daund Crime: दौंड हादरलं! शाळेच्या रिझल्टवरून पोटच्या 9 वर्षांच्या लेकीची नराधम बापाने संपवलं; कटरने वार केल्यानंतर पेटवला मृतदेह

Daund Crime: बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना दौंड तालुक्यातील देऊळगावराजे परिसरात घडली आहे. केवळ गुणपत्रिकेतील खाडाखोड केल्याच्या किरकोळ कारणावरून, एका नराधम बापाने आपल्या ९ वर्षांच्या चिमुकलीचा अमानुष छळ करून तिचा जीव घेतला. दारूच्या नशेत केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा सुन्न झाला आहे.

संताप अन् क्रूरतेचा कळस
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शांताराम चव्हाण (वय ३३) याच्या दोन्ही मुलांचे शाळेचे निकाल नुकतेच लागले होते. मुलगा संस्कार याचा वर्गात पहिला क्रमांक आला होता. मात्र, मुलगी अनामिका (वय ९) हिने भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केली. याचा राग मनात धरून आणि दारूच्या नशेत धुंद असलेल्या शांतारामने अनामिकाला आधी लाकडाच्या फटक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर, क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने लाकूड कापण्याच्या ‘कटर मशिन’ने तिच्या गळ्यावर आणि हातावर वार केले.

पुरावा नष्ट करण्यासाठी घर पेटवले
मुलीचा जागीच मृत्यू झाल्यानंतर, आरोपीने तिचे शरीर एका साडीत गुंडाळले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातच मृतदेह पेटवून दिला. या आगीत घरही जळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असता, जळालेल्या घराच्या राखेमध्ये चिमुकलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आणि रक्ताने माखलेले मशिन सापडले.

पोलिसी कारवाई
दौंड पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपी शांताराम चव्हाण याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!