पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ येथे सल्लागार (सी अँड आयटी) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 100000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. ६५ वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 14 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. praveen.kumar.l@sail.in या ई-मेल आयडीवर मेल करता येऊ शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.sail.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


