Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चंद्रपूरमध्ये तरुणाचे चार वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

चंद्रपूरमध्ये तरुणाचे चार वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वरोरा (चंद्रपूर): शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधीसागर तलाव परिसरात एका तरुणाने चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पीडित बालकाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तरुणावर पोक्सो तसेच बळजबरी या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधीसागर तलाव परिसरात सायंकाळच्या सुमारास अंधार असल्याचा गैरफायदा घेत आरोपी साहिल संदीप तेलंग (२०, वरोरा) याने एका चारवर्षीय बालकाला चॉकलेटचे आमिष दाखवून तेथे नेले आणि अनैसर्गिक कृत्य केले. पीडित बालकाने घरी परतल्यावर घडलेली घटना पालकांना सांगितली. यानंतर पालकाने तत्काळ वरोरा पोलीस स्टेशन गातून घडलेल्या प्रकरणाची तक्रार केली. पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करून घेतली व आरोपीविरुद्ध कलम १३७/२ नुसार बळजबरी आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदविला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे करीत आहेत. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, पालकांनी आपल्या चिमुकल्यांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असतानाच अत्याचार होऊ शकेल, अशा संभाव्य ठिकाणी पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज या घटनेमुळे निर्माण झाली आहे.

शहरात संतापाची लाट

ही घटना उघडकीस येताच वरोरा शहरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि बालहक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!