Junnar Beef Seized: जुन्नर शहरतील माईमोहल्ला येथे जुन्नर पोलीसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या दोन गायी व दोन कालवडी तसेच सुमारे दोन टन गोमांस असा एकूण 3 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माई मोहल्ला येथील जैन मंदिरा शेजारी असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये गायींचे कापलेले मांस मिळून आले तसेच दुसऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये चार गायी बांधलेल्या मिळून आल्या . सदरचे पत्र्याचे शेड कोणाचे आहे. याबाबत कोणीही माहिती दिली नाही. पोलिसांची चाहूल लागताच चार ते पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
पत्र्याच्या शेडमध्ये तीन लाख रुपये किंमतीचे दोन हजार किलो मांस व 36 हजार रुपये किमतीच्या चार गायी मिळून आल्या. याचा पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकिय अधिकारी अशफाक पठाण यांनी सदर ठिकाणचे मांसाचे नमुने घेतले असून उर्वरीत मांस नष्ट करण्यात आले तसेच गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली असल्याचे पोलिसां कडून सांगण्यात असले.


