Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातचा ईडी कोठडीत मोठा दावा; ६० बँक खात्यांमागील ‘ते’ गुपित ऐकून कोर्टही चक्रावले!

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातचा ईडी कोठडीत मोठा दावा; ६० बँक खात्यांमागील ‘ते’ गुपित ऐकून कोर्टही चक्रावले!

Ashok Kharat Case: स्वतःला देवाचा अवतार सांगून भक्तांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. मनी लॉन्डरिंग (पैशांची बेकायदेशीर अफरातफर) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केल्यानंतर आज खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी ईडीने बाबाच्या आर्थिक साम्राज्याचे अनेक धक्कादायक पुरावे कोर्टासमोर सादर केले, तर दुसरीकडे खरातने “मला फसवण्यात आले,” असा कांगावा करत सर्व आरोपांपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

‘त्या’ ६० खात्यांशी माझा संबंध नाही; खरातचा अजब दावा
न्यायालयात जेव्हा ईडीने बँक खात्यांचे पुरावे सादर केले, तेव्हा अशोक खरातने स्वतःचा बचाव करताना सांगितले की, “त्या 60 खात्यांवर मला नॉमिनी का आणि कसे ठेवले गेले, याची मला काहीच कल्पना नाही. माझा मोबाईल नंबर त्या खात्यांना का जोडला गेला, हेही मला माहीत नाही. मला बँकेकडून फक्त 9 टक्के दराने चांगले व्याज मिळेल असे सांगण्यात आले होते, म्हणूनच मी तिथे गेलो होतो.”

ईडीने कोर्टात उघड केला भोंदू बाबाचा ‘मास्टरप्लॅन’:
धार्मिक भीती दाखवून ५.६२ कोटींची वसुली: खरातने आपण देवाचा अवतार असल्याचा खोटा आव आणला. लोकांच्या मनात भीती निर्माण करून पूजा-अर्चा आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तब्बल 5 कोटी 62 लाख रुपये उकळले. एकाच व्यक्तीकडून 3 कोटी 80 लाख, तर इतरांकडून 50 ते 80 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. यातील काही पैसे अमेरिकेत उपचारासाठी वापरल्याचाही संशय आहे.

६० खाती, पण नंबर एकच:
समता पतसंस्थेमध्ये 60 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही सर्व खाती वेगवेगळ्या लोकांची असली, तरी त्या सर्वांना जोडलेला मोबाईल नंबर आणि त्या खात्यांचा ‘नॉमिनी’ एकटा अशोक खरातच होता. या संशयास्पद खात्यांमधून तब्बल 23 कोटी 80 लाख रुपये रोख (Cash) स्वरूपात काढण्यात आले आहेत. एवढी मोठी रोकड कुठे गायब करण्यात आली, याचा तपास ईडी करत आहे.

३४ बेनामी एफडी (FD) खाती:
पतसंस्थेमध्ये कोणत्याही केवायसी (KYC) किंवा वैध कागदपत्रांशिवाय 34 बेनामी मुदत ठेव (FD) खाती सुरू करण्यात आली होती. खरात स्वतः बँकेत जाऊन 4 ते 6 लाख रुपये रोख जमा करायचा. अशा प्रकारे 1 कोटी 34 लाख रुपयांच्या एफडी करण्यात आल्या आणि त्या मॅच्युअर झाल्यावर साधारण 3 कोटी रुपये रोख काढण्यात आले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!