Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातची कोठडीत रवानगी; उद्या पुन्हा कोर्टवारी, SIT घेणार ताबा

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातची कोठडीत रवानगी; उद्या पुन्हा कोर्टवारी, SIT घेणार ताबा

Ashok Kharat Case: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आज झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे खरातचा मुक्काम आता पोलीस कोठडीतून नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात येणार आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी आणि न्यायालयाचे आदेश
आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुरक्षेचा प्रश्न आणि वाढती गर्दी लक्षात घेता, प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्स (VC) द्वारे ही सुनावणी पार पडली. न्यायाधीश श्रीमती बी. इन. ईचपुराणी यांच्या खंडपीठासमोर आरोपीची ओळख पटवून सुनावणीची सुरुवात झाली. दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने खरातची रवानगी आता नाशिक सेंट्रल जेलमध्ये केली जाणार आहे. मात्र, तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणेने केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

आता पुढे काय? एसआयटीचा (SIT) अ‍ॅक्शन प्लॅन
अशोक खरातला आज मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र, त्याचा ताबा पुन्हा घेण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी (SIT) सज्ज झाली आहे. तिसऱ्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी उद्या पुन्हा न्यायालयाकडे त्याचा ताबा मागणार आहे. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी माहिती दिली की, “तिसऱ्या गुन्ह्यासाठी ताबा मिळवण्याचा आमचा अर्ज मान्य झाला असून, उद्याची सुनावणी या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असेल.”

तपास यंत्रणेची कडक पावले
तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर करत आरोपीची बाजू खोडून काढली. आरोपीचे वकील सचिन भाटे यांनीही युक्तिवाद केला, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने कोठडीबाबत कडक भूमिका घेतली. आता खरातच्या विरोधात दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा वेगाने हालचाली करत असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!