Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्धाला ‘डिजिटल अरेस्ट’; बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी लुटले 1 कोटी रुपये

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्धाला ‘डिजिटल अरेस्ट’;  बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी लुटले 1 कोटी रुपये

Pune Crime: सायबर भामट्यांनी आता ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अडकवण्याची आणि अटकेची धमकी देऊन एका ७७ वर्षीय वृद्धाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक आणि बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीचा ‘भयंकर’ सापळा
चिंचवडमधील शिवाजी पार्क परिसरात राहणारे अशोक कृष्णा सराफ यांना भामट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जाळ्यात ओढले. सुरुवातीला टेलिफोन विभागाचे कर्मचारी, नंतर सर्व्हिलन्स ऑफिसर आणि शेवटी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून आरोपींनी सराफ यांच्याशी संपर्क साधला. तुमचे कॅनरा बँकेचे खाते ‘नरेश गोयल’ यांच्यावरील ईडी (ED) कारवाईशी संबंधित मनी लाँड्रिंगसाठी वापरले गेले आहे, असा खोटा दावा करत त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली. आरोपींनी सराफ यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला.

तपासणीच्या नावाखाली १ कोटी लंपास
बँक खात्यातील रकमेची ‘लीगल व्हेरिफिकेशन’ (कायदेशीर वैधता तपासणी) करावी लागेल, असे सांगून भामट्यांनी सराफ यांचा विश्वास संपादन केला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व पैसे परत मिळतील, असे आश्वासन देत त्यांना १ कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांवर पाठवण्यास भाग पाडले. सराफ यांनी आपल्या आयुष्याची पुंजी आणि म्युच्युअल फंडातील पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आरोपींनी आपले संपर्क क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सराफ यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांची कारवाई
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये (६६ सी, ६६ डी) गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक नाळे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयित बँक खात्यांची माहिती गोळा केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!