Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar-Sharad Pawar Alliance: भाजप विरोधात ‘राष्ट्रवादी’ एकवटली; साताऱ्यात घड्याळ–तुतारीची युती

Ajit Pawar-Sharad Pawar Alliance: भाजप विरोधात ‘राष्ट्रवादी’ एकवटली; साताऱ्यात घड्याळ–तुतारीची युती

Ajit Pawar-Sharad Pawar Alliance : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुकी लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.’भाजपकडून सर्व पक्ष संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत, त्यामुळेच भाजपविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असे स्पष्ट मत शिंदे यांनी व्यक्त केले. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत संयुक्त लढ्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सध्या राज्यात भाजपकडून इतर राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विचारसरणी आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच सातारा जिल्ह्यात भाजपविरोधात एकत्रितपणे निवडणूक लढवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बहुतांश ठिकाणी अजित पवार गटाचे घड्याळ हे चिन्ह वापरून उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत. तर काही ठिकाणी राजकीय समीकरणे पाहून शरद पवार गटाचे तुतारी हे चिन्ह वापरले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्थानिक पातळीवरील समन्वय साधून चिन्हांचे वाटप करण्यात आले असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.

साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, या युतीचा निवडणूक निकालांवर काय परिणाम होतो, याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!