Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोल्हापूर हादरलं! आईवरून शिवी दिल्याने राग अनावर; जिगरी मित्राची वायरने गळा आवळून हत्या

कोल्हापूर हादरलं! आईवरून शिवी दिल्याने राग अनावर;  जिगरी मित्राची वायरने गळा आवळून हत्या

Kolhapur Crime News: कोल्हापूरातील हॉकी स्टेडियम परिसरात सोमवारी पहाटे एक तरुणाचा मृतदेह विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. तपासात उघड झाले की खून हा पीडिताचा जिवलग मित्रानेच केला होता. पोलिसांनी अवघ्या सहा तासांच्या आत आरोपीला गजाआड केले आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव मनीष जालिंदर राऊत (२८, रा. कळंबा रिंगरोड) असून मृत युवकाची ओळख सिद्धू शंकर बनवी (२०, मूळ रा. शिकनंदी, बेळगाव; सध्या रा. वाशी नाका, कळंबा रिंगरोड) अशी पटली आहे. दोघेही एकाच ठिकाणी काम करीत होते आणि अतिशय जिवाभावाचे मित्र म्हणून ओळखले जात होते. मात्र, किरकोळ वादातून ही दुर्घटना घडल्याचं तपासात स्पष्ट झाले आहे.

घटना अशी उलगडली?

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत दोघे मद्यपान करत बसले होते. रात्री 2 च्या सुमारास जेवणासाठी ते जवळच्या हॉटेलमध्ये गेले. तेथे किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. याच धुसफुशीदरम्यान सिद्धूने मनीषच्या आईविषयी शिवीगाळ केली. यानंतर जेवण आटोपून दोघे दुचाकीवरून निघाले. वाटेत लघुशंकेसाठी थांबले असता पुन्हा वाद पेटला. त्यावेळी रस्त्यालगत बसलेल्या सिद्धूचा मनीषने तिथेच पडलेली वायर घेऊन गळा आवळला. यात सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह जवळच्या लाईटच्या खांबाला बांधून रात्रभर सोडून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले.

हेही वाचा – पुणे हादरलं आधी मैत्रिणीची हत्या अन् मग तरुणाचं खळबळजनक पाऊल, धक्कादायक घटना

आरोपीला अटक

दरम्यान, सोमवारी पहाटे ५ वाजता परिसरातील नागरिकांना एका खांबाला बांधलेला तरुण दिसताच त्यांनी लगेच जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता मृतदेहाच्या तोंडातून रक्त येत असल्याने हा खून असल्याची खात्री झाली. तत्काळ गुन्हेअन्वेषण पथकांसह शहरातील सर्व तपास पथकांना बोलावण्यात आले. मृताची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण होते. मात्र, खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी प्रथम मृताची ओळख निश्चित केली आणि त्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचत अवघ्या सहा तासांत संपूर्ण गुन्ह्याचा तपास लावला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!