Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: कोरेगाव पार्क हादरलं! ओळखीचा फायदा घेत धावत्या कारमध्ये महिलेसोबत नराधमाचे नको ते कृत्य

Pune Crime: कोरेगाव पार्क हादरलं! ओळखीचा फायदा घेत धावत्या कारमध्ये महिलेसोबत नराधमाचे नको ते कृत्य

Pune Crime: पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर एका नराधमाने ओळखीचा फायदा घेत धावत्या कारमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पार्टीसाठी आली होती. याच ठिकाणी तिची ओळख आरोपी पुरुषाशी झाली. पार्टी संपल्यानंतर रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडताना, ‘मी तुला सुरक्षित घरी सोडतो’ असे सांगून आरोपीने महिलेला आपल्या कारमध्ये बसवले. मात्र, घरी सोडण्याऐवजी त्याने मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावरील निर्जनस्थळी धावत्या कारमध्येच महिलेवर अत्याचार केला.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सध्या हॉटेल परिसरातील आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली जात आहे. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच, कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!