Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; जैन बोर्डींग जमीन प्रकरणात थेट मोदींकडे चौकशी आणि कारवाईची मागणी

Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; जैन बोर्डींग जमीन प्रकरणात थेट मोदींकडे चौकशी आणि कारवाईची मागणी

पुणे: पुण्यातील जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारातील अनियमितता आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणामुळे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपानुसार, पुण्यातील हिराचंद नेमचंद दोशी मेमोरियल ट्रस्टच्या सुमारे 3 एकर जमिनीचा व्यवहार गोखले लँडमार्क्स एलएलपी या कंपनीमार्फत करण्यात आला असून, त्यामध्ये कायदेशीर आणि प्रक्रियात्मक नियमांचे उल्लंघन झाले आहे. या व्यवहारासाठी बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी (महाराष्ट्र) आणि बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी (कर्नाटक) या संस्थांनी मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. मात्र, त्यांनी कर्ज देताना आवश्यक ती तपासणी न करता नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे या निर्णयांवर बाह्य दबाव किंवा प्रभाव होता का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विजय कुंभार यांनी म्हटले आहे की, या दोन्ही मल्टी-स्टेट को-ऑप सोसायट्यांच्या प्रशासकीय देखरेखीची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आहे. तसेच त्यांनी गोखले लँडमार्क्स एलएलपीच्या ‘गोखले बिझनेस बे’ प्रकल्पाला प्रोत्साहन दिले असून, त्यांचे या कंपनीच्या भागीदारांशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा थेट आणि अप्रत्यक्ष असा दोन्ही प्रकारचा संबंध असल्याचे स्पष्ट दिसते.

मोहोळ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ते गोखले इस्टेट्स एलएलपी या कंपनीत 50 टक्के भागीदार असल्याचे नमूद असून ही कंपनी गोखले लँडमार्क्सशी संबंधित आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने म्हणजेच महारेराने गोखले लँडमार्क्सवर रेरा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे. ‘गोखले बिझनेस बे’ आणि ‘तेजकुंज’ या दोन्ही प्रकल्पांसाठी एकच बँक खाते वापरण्यात आले तसेच 70 टक्के निधी स्वतंत्र ठेवण्याच्या नियमाचे पालन झाले नाही. त्यामुळे या प्रकल्पांची नोंदणी रद्द करून बँक खाती गोठवली आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली.

तरीदेखील संबंधित सहकारी संस्थांनी सुमारे 70 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि नंतर तारण हक्क सोडला. या सर्व प्रकारानंतरही मोहोळ यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!