Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Abortion Pill Overdose: धुळ्यात गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन तरुणीच्या जिवावर बेतलं; 6 महिन्यांचे गरोदरपण लपवण्याच्या प्रयत्नात 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Abortion Pill Overdose: धुळ्यात गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन तरुणीच्या जिवावर बेतलं; 6 महिन्यांचे गरोदरपण लपवण्याच्या प्रयत्नात 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Abortion Pill Overdose: धुळे शहरातील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अविवाहित असताना राहिलेले गरोदरपण लपवण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने एका १८ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण धुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध गर्भपाताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नेमका प्रकार काय घडला?
धुळे शहरालगतच्या एका गावातील १८ वर्षीय तरुणीची प्रकृती अचानक खालावल्याने तिला देवपूर भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती २४ आठवड्यांची (सहा महिने) गरोदर असल्याचे समोर आले. इतक्या प्रगत अवस्थेतील गर्भ पाडण्यासाठी तिने काही तीव्र औषधांचे किंवा गोळ्यांचे सेवन केले होते, ज्यामुळे तिची प्रकृती वेगाने बिघडली.

रक्तदाब घटला अन् झटके आले
औषधांच्या ओव्हरडोजमुळे तरुणीचा रक्तदाब (Blood Pressure) अत्यंत खालच्या पातळीवर गेला आणि तिला तीव्र झटके येऊ लागले. खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तिची प्राणज्योत मालवली.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी सध्या ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. मात्र, या मृत्यूने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ६ महिन्यांचा गर्भ असताना इतक्या घातक गोळ्या तरुणीला कोणी उपलब्ध करून दिल्या? यामागे गर्भपाताच्या गोळ्या बेकायदेशीरपणे विकणारे एखादे रॅकेट सक्रिय आहे का? त्या तरुणीला या स्थितीत ढकलणारा तो तरुण कोण होता? पोलीस आता या सर्व बाबींचा तांत्रिक तपास करत असून, तरुणीच्या संपर्कात असलेल्या संशयितांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!