Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवड हादरले! अडीच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; ‘आंब्याचं’ आमिष दाखवून केलं नको ते कृत्य

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवड हादरले! अडीच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; ‘आंब्याचं’ आमिष दाखवून केलं नको ते कृत्य

Pimpri-Chinchwad Crime: लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले असतानाच, पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरातून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय नराधमाला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील एकतानगर भागात दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विजय भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित चिमुरडीला आंबा देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. मंगळवारी सकाळी बालिकेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.

वैद्यकीय तपासणीत सत्य उघड
रुग्णालयातील डॉक्टरांनी चिमुरडीची तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर मुलीने आरोपीने घरात नेऊन केलेल्या कृत्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले. काळेवाडी पोलिसांनी घटनेची दखल घेत दोन पथके तैनात केली आणि आरोपीच्या घरातून त्याला झडप घालून अटक केली.

परिसरात तीव्र संताप
पीडितेच्या २८ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या निर्घृण घटनेमुळे काळेवाडी परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “लहान मुले घरातून बाहेर पडतानाही सुरक्षित नसतील तर दाद कुणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!