Today मंगळवार, 18th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jyoti Kadam Passes Away: पुण्यातील तरुण पत्रकार ज्योती कदम यांचे अकाली निधन; कालपर्यंत कामावर, आज निधनाची वार्ता… सहकाऱ्यांना मोठा धक्का

Jyoti Kadam Passes Away: पुण्यातील तरुण पत्रकार ज्योती कदम यांचे अकाली निधन; कालपर्यंत कामावर, आज निधनाची वार्ता… सहकाऱ्यांना मोठा धक्का

Jyoti Kadam Passes Away: पुण्यातील पत्रकारिता क्षेत्रातील एक उमदं व्यक्तिमत्व आणि ‘महाराष्ट्र जागरण’च्या उपसंपादक ज्योती कदम यांचे अकाली निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कदम कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, पुणे पत्रकारिता वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत उत्साही आणि कामाप्रती निष्ठा असलेल्या एका तरुण पत्रकाराच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

विविध वृत्तसंस्थांमध्ये बजावली होती महत्त्वाची कामगिरी
ज्योती कदम यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम केले होते. त्यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ (Pune Prime News), ‘लेटेस्टली मराठी’ (LatestLY Marathi) आणि ‘महाराष्ट्र जागरण’ (Maharashtra Jagran) या वृत्तसंस्थांमध्ये आपल्या लेखणीचा ठसा उमटवला होता. सध्या त्या महाराष्ट्र जागरण येथे उपसंपादक (Sub-editor) पदावर कार्यरत होत्या. आपल्या सातत्यपूर्ण कामामुळे त्यांनी अत्यंत कमी वेळात सहकाऱ्यांमध्ये आणि वाचकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

मंगळवारपर्यंत कामावर, बुधवारी निधनाची वार्ता; सहकाऱ्यांना धक्का
ज्योती यांच्या निधनाची बातमी त्यांच्या सहकाऱ्यांसाठी पूर्णपणे अनपेक्षित आणि हादरवून टाकणारी ठरली. मंगळवारपर्यंत त्या कार्यालयात कामावर होत्या आणि नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत होत्या. मात्र, बुधवारी अचानक त्यांच्या कुटुंबीयांनी ज्योती यांच्या निधनाची धक्कादायक माहिती दिली. एका दिवसापूर्वी एकत्र काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याच्या जाण्याने महाराष्ट्र जागरणच्या कार्यालयातील वातावरण सुन्न झाले असून, अनेकांना हा धक्का पचवणे कठीण जात आहे.

कदम कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
ज्योती यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. एक आश्वासक करिअर आणि उज्ज्वल भविष्य समोर असताना काळाने घातलेल्या या झडपेमुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे सहकारी आणि मित्रपरिवाराने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एक निष्ठावान आणि कष्टाळू पत्रकार म्हणून ज्योती कदम यांचे नाव कायम स्मरणात राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!